जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । जळगाव शहर मनपात महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांची वर्णी लागली असून घंटागाडीवर अद्यापही माजी महापौर सौ.भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके यांच्या नावाची ऑडिओ क्लीप वाजविण्यात येत असल्याचे वृत्त जळगाव लाईव्ह न्यूजने प्रसिद्ध केले होते. वृत्ताची दखल घेत माजी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी तात्काळ ती ऑडीओ क्लीप न वाजविण्याच्या सूचना केल्या आहेत.