जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । गणेशोत्सवात हद्दपार असलेल्या दोन आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. विशाल राजू अहिरे आणि ललित उर्फ सोनू गणेश चौधरी असे दोघांचे नाव असून त्यांच्यविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत असे की, गणेशोत्सवात पोलीस प्रशासनाने विशाल अहिरे व ललित उर्फ सोनू चौधरी या दोघा गुन्हेगारांना हद्दपार केले होते. दरम्यान संशयित आरोपी विशाल आहिरे हा शनिवारी 18 सप्टेंबर रोजी रामेश्वर कॉलोनीत आला असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना माहिती मिळाली.त्यानुसार शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हद्दपार असलेला आरोपी विशाल अहिरे याला त्याच्या रामेश्वर कॉलनी येथील घरातून ताब्यात घेतले.

तर दुसरा आरोपी ललित उर्फ सोनू चौधरी हा शहरातील ईश्वर कॉलनीमध्ये विना मास्क फिरत असताना मिळून आला. ललित याला शहरात प्रवेश करणेबाबत परवानगी घेतली आहे का? असे विचारले असता त्याने कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे सांगितले.
दरम्यान, या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून दोघांविरुधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एमआयडीसी पोलिस करण्यासाठी करत आहे.











