…ही जनतेच्या मनातील इच्छा, गिरीश महाजनांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

सप्टेंबर 20, 2021 10:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२१ । महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांचे हल्ले सुरूच असून आता माजी मंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जनादिवशीच सरकारच्या विसर्जनावर जोर दिला आहे.

girish mahajan udhav thackera

‘राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचेही आता विसर्जन व्हावे, ही जनतेच्या मनातील इच्छा आहे’, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी जळगावात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला लक्ष्य आहे.  करोना लसीकरण महाशिबिराचा आढावा घेण्यासाठी गिरीश महाजन हे जळगावात आले होते.

राज्यात आता बदल झाला पाहिजे, हे जनतेच्याच मनात आहे. हे सरकार जाऊन भाजप सरकार आले तर सर्वांना न्याय मिळेल. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावत आहोत. आमचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर हे राज्यभर दौरा करत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असेही गिरीश महाजन यावेळी बोलताना म्हणाले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now