जळगावात दुचाकी चोरीचे सत्र थांबता थांबेना

सप्टेंबर 11, 2021 2:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२१ । जळगाव शहरात सुरु असलेले दुचाकी चोरीचे सत्र अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीय. शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल एकवीरा येथून एकाची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांने लांबविल. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime

राज सतीश पाटील (वय 23) रा. अहुजा नगर हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. 7 सप्टेंबर रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची (एमएच 19 डीई 2359) क्रमांकाची दुचाकी घरासमोर लावली होती.

त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी राज पाटील यांच्या फिर्यादीनुसार जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल मोरे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now