सहाय्यक आयुक्तांवर हल्ला, सावदा न.प.मध्ये काम बंद आंदोलन

ऑगस्ट 31, 2021 5:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ ।  ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना एका माथेफिरू कडून त्यांच्यावर हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे कापली गेली. तसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली आहे. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे.

sawda

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेंव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात,तेंव्हा अश्या प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच न्हवे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते त्यामुळे अश्या प्रकारच्या हल्ल्याचा “संघटित निषेध” करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे.

हा केवळ एका अधिकाऱ्यावरील हल्ला नसून असे भ्याड हल्ले संपूर्ण नोकरशाहीस च जायबंदी करतात. त्यामुळे या घटनेचा निषेध म्हणून आज 31 रोजी “सावदा नगरपरिषदेचे” संपूर्ण प्रशासकीय कामकाज(अत्यावश्यक सेवा वगळून) कडकडीत रित्या बंद करण्यात येत आहे.
या घटनेचा आज काळ्या फिती लाऊन काम बंद आंदोलन ला पाठिंबा देऊन सावदा नगरपरिषद मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तीव्र निषेध नोंदवला.

शासनामार्फत आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी याकरिता मा. प्रांत साहेब फ़ैझपुर तसेच मा.किशोर चव्हाण साहेब मुख्याधिकारी सावदा नगरपरिषद यांना सावदा नगरपरिषद अधिकारी/कर्मचारी यांच्याकडून निवेदन देण्यात आले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now