⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

‘भविष्यातील रोजगाराच्या संधी’ या विषयावर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑगस्ट २०२१ । राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत शुक्रवार, 27 ऑगस्ट, 2021 रोजी दुपारी 3 ते 4.30 या वेळेत कौशल्यातून रोजगाराकडे (भविष्यातील रोजगाराच्या संधी) या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन शिबिरातरविशंकर कोरगल, Technical advisor (IGPVET Aurangabad) Maharashtra state india हे दुपारी 3.00 ते 3.25 या वेळेत मार्गदर्शन करणार आहेत.

प्रशांत गिरबाने, Director General of Maratha chamber of commerce, Indus. & agri. हे दुपारी 3.25 ते 3.50 या वेळेत तर हनुमंतराव गायकवाड (Director of BVG india limited) हे दुपारी 3.50 ते 4.15 या वेळेत कौशल्यातून रोजगाराकडे या विषयावर मार्गदर्शन करणार असून दुपारी 4.15 ते 4.30 वाजेपर्यंत प्रश्नोत्तरे घेण्यात येणार आहे.

या मागदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.
फेसबुक – https://www.facebook.com/MaharashtraSDEED
युट्युब – https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A