जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२१ । गेल्या १५ ते २० दिवसापासून पाचोरा शहरात लसीकरण बंद होते. लसीची पूर्तता न झाल्यामुळे शहरांत लसीकरण बंद होते व अनेक नागरिक लसीकरच्या प्रतीक्षेत होते.
ते आज लसीकरण सुरु झाले अनेक नागरिकांना दिवस उलटून गेल्यावर ही लसीचा पहिला व दुसरा डोस मिळत नव्हता. त्यामुळे प्रशासनावर देखील नागरिक नाराज होते व कोरोना च्या तिसऱ्या लाटेची धाकधूक ही आहेच. शेवटी आज लसीचा पुरवठा झाल्या ने पाचोरा शहरात लसीकरण पुन्हा सुरु करण्यात आले आहे.पण नागरिकांनी आज लसीकरण केंद्रा बाहेर गर्दी केली आहे त्यामुळे सोसिएल डिस्टन्स चा फज्जा उडाला आहे..
येथे सुरु आहे लसीकरण
पाचोरा ग्रामीण शासकीय रुग्णालय(पाणी पुरवठा ऑफिस )शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र बाहेरपुरा पाचोरा. येथे कोविशिल्ड या लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध आहे.