जळगाव शहर

खड्ड्यात फसली चारचाकी, रस्त्यावर गाडी सोडून चालक गेला घरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२१ । शहरात अमृत योजना आणि भूमिगत गटारीसाठी जागोजागी चाऱ्या खोदण्यात आल्या आहेत. अनेक परिसरातील चाऱ्या अद्यापही बुजविण्यात आलेल्या नाहीत. मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गायत्री नगरात एक चारचाकी खड्ड्यात फसली. बराच प्रयत्न करून देखील गाडी बाहेर निघत नसल्याने अखेर चालकाने गाडी तिथेच सोडून दिली आणि घर गाठले.

शहरात अमृत योजना व भूमिगत गटारीचे काम सुरू असल्याने पाईपलाईन टाकण्यासाठी प्रत्येक प्रभागात चारी खोदण्यात आली आहे. अनेक प्रभागातील चाऱ्या अद्यापही बुजविण्यात आलेल्या नाही. मंगळवारी सायंकाळपासून शहरात दमदार पावसाला सुरुवात झाली. रात्री १० वाजेच्या सुमारास मेहरूण तलाव जवळील गायत्री नगरात एका चारीमध्ये चारचाकी क्रमांक एमएच.०३.बीडब्ल्यू.७५०१ अडकली. एक चाक खड्ड्यात रुतल्याने चारचाकी बाहेर पडत नव्हती. भर पावसात चालकासह नागरिकांनी प्रयत्न करून देखील गाडी निघत नसल्याने अखेर ती तिथेच सोडून जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. रात्रभरापासून चारचाकी रस्त्यावरच उभी आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button