नागरिकांनो सावधान व्हा.. ‘या’ प्रकारे तुमचीही होऊ शकते फसवणूक!

ऑगस्ट 19, 2022 3:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२२ । आतापर्यंत आपण बनावट लिंकच्या माध्यमातून अनेक नागरिकांची फसवणून झाल्याचे व्रत वाचले असेल. असाच एक प्रकार समोर आला आहे. यात देखील वीजबिल भरण्यासाठी बनावट लिंक पाठवून चक्क ३ लाख ९६ हजार ६०९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 14T142958.323 jpg webp

जगदीश प्रितमदास जेठवाणी (वय ४०, रा. वैभव कॉलनी, गणपती नगर, जळगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. जेठवानी हे येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० ते ७ वाजेच्या दरम्यान, त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून व्हॅटस्ॲप मॅसेज आला. विजबिल भरण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार जगदीश जेठवाणी यांनी दिलेल्या नंबरवर कॉल केला असता आपण ईलेक्ट्रीक ऑफीसर असल्याचे सांगितले. वीजबिल भरण्याचे सांगून जेठवाणी यांच्या मोबाईलवर बनावट लिंक पाठविली. दिलेल्या लिंकच्या माध्यमातून बँकेचे डिटेल्स घेवून त्यांच्या खात्यातून परस्पर ३ लाख ९६ हजार ६०९ रूपये वळविण्यात आले.

दरम्यान, जगदीश जेठवाणी यांनी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुरूवार १८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now