जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२१ । एरंडोल तालुक्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके तग धरू लागल. तसेच पिकांची वाढ खुंटली आहे. आणखी चार ते पाच दिवस जर पावसाने हजेरी लावली नाही तर कोरडा दुष्काळाला सामोरे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे आहे.
पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी हवालदिल झाला आहे. कोरोना सारख्या महामारी चे संकट नुकतच गेले असलं तरी शेतकऱ्यांपुढे अस्मानी संकट येऊन ठेपलाय आहे. श्रावण महिन्यात दमदार पाऊस होईल अशी आशा होती. तरी अंजनी नदी पात्रात कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. तरी शेतकऱ्यांनी केलेली दुबार पेरणी ही वाया गेली सारखी आहे. त्याशिवाय विहिरीच्या पाण्याची पातळी खालावत आहे.