⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2024
Home | महाराष्ट्र | नवा सातबारा, पारदर्शकतेबरोबरच वेळही वाचणार ; वाचा जुन्या व नव्या उताऱ्यातील बदल

नवा सातबारा, पारदर्शकतेबरोबरच वेळही वाचणार ; वाचा जुन्या व नव्या उताऱ्यातील बदल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ ऑगस्ट २०२१ । रविवारी (दि. १) महसूल दिनापासून राज्यभरातील नागरिकांना नव्या फॉरमॅटमध्ये ऑनलाईन सात बारा (7/12) उपलब्ध झाला आहे. यामुळे मालमत्ता विक्री, हस्तांतरण, बोजा चढविण्यासह प्रत्येक व्यवहारात स्पष्टता, पारदर्शकतेबरोबरच वेळही वाचणार आहे. फेरफार नोंदींसह प्रलंबित फेरफारही त्यावर स्पष्ट नमूद असल्याने फसवणूक टळेल. मालमत्ता हस्तांतरणासाठी अत्यावश्यक सर्च रिपोर्ट मिळणेही सोपे झाले आहे.

जुन्या व नव्या उताऱ्यात हे बदल

– नमुना ७ मधील मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजे, इ-कराराच्या नोंदी जुन्या उताऱ्यावर कंस करून दर्शविल्या जात होत्या. आता या सर्व बाबींवर कंस करून त्या आडवी रेष मारुन खोडून दर्शविण्यात येतील.

-जुने फेरफार यापूर्वी कळत नव्हते. आताच्या उताऱ्यावर खालच्या बाजूला जुने फेरफार असा स्पष्ट उल्लेख आहे. नमुना ७ वर नोंदविलेला परंतु त्यावर कार्यवाही झाली नसल्यास हा फेरफार प्रलंबित असेपर्यंत प्रलंबित फेरफार असा उल्लेख त्यावर देण्यात आला आहे. इतर हक्क खालच्या रकान्यात दर्शविण्यात आले आहे. एकही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही असेदेखील तेथे नमूद करण्याची व्यवस्था आहे.

– शेवटच्या फेरफारची नोंद दिनांकासह इतर हक्कांच्या रकान्याच्या खाली दर्शविली आहे.

-पूर्वी फेरफार नोंदी एकत्रच असल्याने कुणाच्या क्षेत्राबाबत आहे हे कळत नव्हते. आता प्रत्येकाच्या नावासमोरच त्याची नोंद होणार असल्याने फेरफारबाबतही स्पष्ट कल्पना येणार आहे.

– लागवडयोग्य क्षेत्र (अ), पोटखराबा क्षेत्र (ब) यासोबतच एकूण क्षेत्र म्हणजे अ+ब अशी स्पष्ट एकत्रित बेरीज येते. पूर्वी अशी बेरीज येत नव्हती.

-क्षेत्राचे एकक शेतीसाठी हेक्टर, आर आणि चौ.मी. असे होते. पण बिगरशेतीसाठी केवळ चौ. मी. असे वापरण्यात येत होते. आता बिगरशेतीच्या क्षेत्रासाठी चौ.मी. सोबतच आर हे एकक देण्याचीही व्यवस्था यात आहे.

-गावाच्या नावासोबतच एल.जी.डी. (LGD) कोड दर्शविला आहे.

– दोन खातेदारांच्या नावामध्ये डॉटेड लाइन असल्याने खातेदारांच्या नावामध्ये अधिक स्पष्टता आली आहे. पूर्वी अशी लाइन नव्हती.

-खाते क्रमांक इतर हक्क रकान्यासोबत नमूद असे. आता तो खातेदारांच्या नावाच्यासोबत नमूद आहे.

-शेती व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुने थोडासा बदल करुन दर्शविण्यात येणार आहेत. तसेच बिनशेती उताऱ्यामध्ये पोटखराबा क्षेत्र, जुडी क्षेत्र व विशेष आकारणी, तसेच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्याय येणार आहेत.

-बिनशेती क्षेत्रासाठी नमुना १२ छापला जाणार नाही.

-पूर्वी क्यूआर कोड नव्हता,आता त्याची सुविधा दिली आहे.

-२०१५-१६ अंदाजे एक कोटी २७ लाख फेरफार ऑनलाइन नोंदवित प्रमाणित करण्यात आले होते. त्यापैकी एक कोटी १७ लाख हे डिजिटल स्वाक्षरीसह जनतेसाठी उपलब्ध करुन दिले आहे.

https:/digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या लिंकवर हा नवीन अद्ययावत सातबारा उतारा मिळेल.

-उताऱ्यासाठी १५ रुपये शुल्क आहे.

 

१. राज्य शासनाची राजमुद्रा आता उताऱ्यावर.

२. मयत किंवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेल्या खातेदाराचे नाव व इतर नोंदी कंस करून दर्शविल्या जात होत्या. आता त्यावर आडवी रेष मारून खोडल्या आहेत.

३. खाते क्रमांक इतर हक्क रकाण्याऐवजी खातेदाराच्या नावासोबत नमूद केला आहे.

४. पूर्वी एकूण क्षेत्र दर्शविले जात नव्हते, आता दर्शविले आहे.

५ व ६. प्रलंबित फेरफार किंवा शेवटचा फेरफार स्वतंत्रपणे प्रथमच नमूद करण्यात आला आहे, पूर्वी अशी व्यवस्था नव्हती.

७. जुने फेरफारचा स्वतंत्र उल्लेख केला आहे.

 

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.