जळगावच्या तरुणीची पुणे प्रवासात धावत्या ट्रॅव्हल्समध्ये छेड, दोघांविरुद्ध गुन्हा

जुलै 31, 2021 10:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जुलै २०२१ । जिल्ह्यातील यावल येथील तरुणी खाजगी ट्रॅव्हल्सने जळगावहून पुणे प्रवास करताना दोन मद्यपी तरुणांनी धावत्या ट्रॅव्हल्समध्ये तिचा विनयभंग केला. तरुणीने सकाळी पुणे गाठल्यावर त्यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार धुळे तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

jalgaon pune travels young women debauchery jpg webp

यावल येथील एक तरुणी जळगाववरून पुण्याचे दिशेने एका खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत होती. रात्री दहा वाजेच्या सुमारास धुळे शहराच्या दिशेने येत असताना सुनील तायडे तसेच त्याच्या सोबत असलेल्या एकाने तरुणीला पाहून अश्लिल हावभाव केले. हा प्रकार तरुणीने वाहन चालक व सहचालक यांना सांगितला. सकाळी पुणे येथे पोहचल्यावर दोघांनी काढता पाय घेतला. पीडितेने पुणे पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. यानंतर गुन्ह्याची कागदपत्रे धुळे पोलिसांना पाठविण्यात आली. त्यावरुन गुरुवारी मध्यरात्री दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. दोघेतरुण एरंडोलहून बसले होते. मद्यपान केल्याने त्यांना फारसे बोलताही येत नव्हते. तरुणीने दाखविलेल्या हिमतीचे कौतुक होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now