विद्यापीठाजवळ अपघात, दुचाकीस्वार जागीच ठार

जुलै 18, 2021 7:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२१ । पाळधीकडून जळगावच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीस्वारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

accident near nmu jpg webp

देवगाव येथील रहिवासी असलेले सोपान सुभाष शिरसाठ हे दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीएम.६६५३ ने पाळधीकडून जळगावकडे येत होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठजवळ असलेल्या हॉटेल देसी तडकासमोर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now