यावल दरोड्यातील अजून एकाच्या आवळल्या मुसक्या

जुलै 15, 2021 9:13 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जुलै २०२१ । यावल शहरातील बाजीराव कवडीवाले या सराफा दुकानात टाकण्यात आलेल्या दरोड्यातील दुसऱ्या संशयित आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहे. चंद्रकांत उर्फ विक्की सोमनाथ चाले (लोणारी) रा. मोहित नगर भुसावळ असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.  दरम्यान, काल या गुन्ह्यातील पहिल्या संशयित आरोपीला कांदीवली येथून अटक करण्यात आली आहे होती.

chandrakant chale jpg webp

याबाबत असे की, याबाबत असे की, यावल शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत जगदीश कवडीवाले यांच्या मालकीचे बाजीराव काशीनाथ कवडीवाले नावाच्या सराफ दुकानात दरोडा टाकण्यात आल्याची घटना ७ जुलै रोजी घडली होती. दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दुकानातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले.  भर दिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे यावलसह परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

दरम्यान, या गुन्ह्यातील पहिला संशयित आरोपी निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड (वय-३२) हा कांदीवली येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती त्यानुसार त्याला कांदीवली मुंबईतून अटक केली होती. त्याने दरोड्यातील गुन्हेगार मुकेश प्रकाश भालेराव रा. बोरवाला ता. यावल ह.मु. तापीकाठ स्मशानुभमी जवळ भुसावळ, सुनिल अमरसिंग बारेला रा. गोऱ्या पाडा ता. चोपडा, रूपेश उर्फ भनभन प्रकाश चौधरी रा. श्रीराम नगर भुसावळ आणि चंद्रकांत उर्फ विक्की सोमनाथ लोणारी रा. मोहित नगर भुसावळ यांचा समावेश असल्याचे सांगितले होते. यातील संशयित आरोपी चंद्रकांत चाले हा भुसावळात असल्याची गोपनिय माहिती मिळाल्यानंतर आज त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज गुरूवारी अटक केली. 

यांनी केली कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक महाजन, शरिफाद्दिन काझी, किशोर राठोड, पोलीस नाईक युनुस शेख, पो.कॉ. विनोद पाटील, रणजीत जाधव यांनी ही कारवाई करत भुसावळातून अटक केली. पुढील कारवाईसाठी यावल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now