जळगावात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

जुलै 12, 2021 3:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२१ । जळगाव शहरातील पोलीस कॉलनीत एका २७ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. नजमा बी जुबेर खाटीख (वय २७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे.

याबाबत असे की, शहरातील पोलीस कॉलनी अजीम किराणा जवळ नजमा खाटीख यांनी आज पहाटच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ नीता भोडे यांनी मयत घोषित केले. दरम्यान, या आत्महत्या मागील कारण अद्यापही कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एपीआय अमोल मोरे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now