बीएचआर प्रकरण : जितेंद्र कंडारेला पुन्हा ३ दिवस कोठडी

जुलै 9, 2021 6:20 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२१ । बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारेची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता पुन्हा तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

jitendra kandare

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोरमधून अटक केली होती. याप्रकरणात अनेक संशयितांना अटक झाली होती. परंतु मुख्य संशयित असलेला सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र खंडारे हा फरार होता. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यासह परराज्यात देखील यांच्या शोधार्थ अनेक पथके पाठवली होती. परंतु दोघेजण पोलिसांना मागील सात महिन्यापासून गुंगारा देण्यात यशस्वी होत होते. परंतु आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून इंदूरमधून अटक केली होती. कंडारेला न्यायालयात कोर्टात हजर केले असता सरकार पक्षातर्फे अॅड. प्रवीण चव्हाण यांनी जितेंद्र कंडारेला पोलीस कोठडी मिळण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. तर पोलीस कोठडीत असताना जळगाव येथील मुख्य शाखेच्या कार्यालयातील तर घरातून अडीच हजार फायलिंग पैकी पुराव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या 25 फाईली कंडारेने पोलिसांना काढून दिल्या आहेत. या फाईलीमधून तपासाच्या दृष्टीने पोलिसांना महत्त्वपूर्ण धागे मिळाले आहेत.

दरम्यान, कंडारेच्या अटकेमुळे बीएचआर घोटाळ्यातील अनेक बाबींचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now