
जळगाव लाईव्ह न्यूज । मागील काही दिवसाच्या मोठ्या घसरणीनंतर आज जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात बदल झाले आहेत. सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. सोबत चांदीमध्ये देखील मोठी वाढ झाली
आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात प्रति तोळा २७०० रुपयाची तर चांदी दरात ३००० रुपयाची वाढ झाली आहे. एकीकडे लग्नसराईच्या आधी सोने चांदीत घसरण दिसून आली मात्र आता लग्नसराईचे दिवस सुरु होताच दोन्ही धातूंमध्ये वाढ झाली. त्यामुळे सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना आज अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
रविवारच्या तुलनेत आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी १ लाख २६ हजार २०० रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर विनाजीएसटी १ लाख ५७ हजार रुपयावर पोहोचला आहे.





