सोने - चांदीचा भाव

सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच ; जळगावात आजही भाव उतरले, पहा नवीन दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीचे सत्र सुरूच असून, आज शनिवारी पुन्हा एकदा जळगावच्या सराफ बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती कमी झाल्या आहेत.

आज सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १,५०० रुपयांपर्यंत घसरण झाली असून, चांदीही प्रति किलो एक हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. विशेष म्हणजे आजपासून लग्नसराईच्या हंगामाला सुरुवात होत असताना सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे लग्नासाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

जळगाव सराफ बाजारात आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख १३ हजार १२० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २३ हजार ५०० रुपये इतका झाला आहे. कालच्या तुलनेत दोन्ही प्रकारच्या सोन्यात १,५०० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.

दुसरीकडे, चांदीच्या दरातही नरमाई दिसून आली आहे. आज चांदीचा भाव प्रति किलो १ लाख ५४ हजार रुपये झाला असून, कालच्या १ लाख ५५ हजार रुपयांच्या तुलनेत एक हजार रुपयांची घट झाली आहे.

दिवाळी पाडवा झाल्यानंतर ११ नोव्हेंबरपासून सोने-चांदीच्या भावात सतत घसरण सुरू आहे. गेल्या १० दिवसात चांदीच्या भावात ३४ हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर सोन्याच्या भावात १७ हजार ९०० रुपयांची घसरण झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button