सोने - चांदीचा भाव

जळगावच्या सुवर्णबाजारात आज सोने २८००, चांदी ४ हजारांनी घसरली, वाचा नवीन दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी समोर आलीय. कालच्या तुलनेत आज (दि. १९ नोव्हेंबर) जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold Silver Price) दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम तब्बल २ हजार ८०० रुपयांहून अधिक घसरण झाली असून, चांदीचा दरही प्रति किलो ४ हजार रुपयांनी खाली आला आहे. लग्नसराईचा हंगाम सुरु होण्यापूर्वीच झालेल्या या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Gold Silver Rate Today

काय आहेत सोन्याचा दर?

जळगाव सराफ बाजारात आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख २० हजार ९१० रुपये झाला आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३२ हजार रुपयांवर आला आहे. काल २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २३ हजार ४७५ रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख ३४ हजार ८०० रुपये होता.

चांदीचा दर

दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. काल १ किलो चांदीचा भाव १ लाख ७३ हजार रुपये होता. त्यात आज ४ हजार रुपयांची घट होऊन चांदीचा दर १ लाख ६९ हजार रुपये प्रति किलो झाला आहे.

सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदीची तयारी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळू शकतो. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि मागणी-पुरवठ्यानुसार आगामी काळात दरांमध्ये पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button