नोकरी संधी

भारतीय कृषी संशोधन परिषदेत सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 1393 पदांची भरती

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी विशेष । तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी उपब्लध झालीय. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत विविध पदांसाठी तब्बल १ हजार ३९३ जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून पात्र उमेदवार १८ नोव्हेंबर पासून अर्ज करू शकणार आहे. तर अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ डिसेंबर २०२६ आहे.

१,३९३ पदांसाठी भरती

या भरतीमध्ये टेक्निकल असिस्टंट (T-3) पदासाठी १ हजार २५४ जागा, तर सिनियर टेक्निकल असिस्टंट (T-4) पदासाठी १३९ जागा उपलब्ध आहेत. म्हणजेच एकूण १ हजार ३९३ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता काय?

टेक्निकल असिस्टंट आणि सिनियर टेक्निकल असिस्टंट या दोन्ही पदांसाठी संबंधित विषयातील पदवी किंवा अभियांत्रिकीची पात्रता आवश्यक आहे. कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी-वनसंवर्धन, अन्न विज्ञान, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, गृह विज्ञान, समुदाय विज्ञान, नैसर्गिक शेती, ग्रंथालय विज्ञान, संगणक उपयोजन, संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांसारख्या विषयांतील पदवीधारक उमेदवार पात्र ठरू शकतात.

याशिवाय B.V.Sc. & A.H., B.F.Sc. तसेच Civil, Agricultural, Mechanical, Electrical, Electronics, Textile Technology, Fibre Processing आणि Electronics & Instrumentation Engineering या शाखांमधील B.E./B.Tech. पदवी किंवा संबंधित तीन वर्षांचा डिप्लोमा असलेले उमेदवारही पात्र आहेत. IT, Computer Science किंवा Electronics & Communication Engineering मधील B.E./B.Tech. पदवीधारकांसाठीही संबंधित कार्यात्मक गटाच्या आवश्यकतेनुसार संधी आहे.

वयोमर्यादा आणि सवलत

या भरतीसाठी उमेदवाराचे वय १७ डिसेंबर २०२६ रोजी २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना कमाल वयात ५ वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादा सवलत मिळणार आहे.

अर्ज शुल्क किती?

सर्वसाधारण आणि OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ३०० रुपये आहे. तर SC, ST, Ex-Servicemen, महिला आणि ट्रान्सजेंडर उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

संपूर्ण भारतात नोकरीची संधी

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीची संधी मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button