⁠ 
बुधवार, मे 22, 2024

एरंडोल येथे मैत्री सेवा फाउंडेशन आयोजित निसर्ग सप्ताह

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जुलै २०२१ । मैत्री सेवा फाउंडेशन आयोजित निसर्ग सप्ताह अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाचे उद्घाटन एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी फीत कापून व एक रोप भेट देऊन केले. यास सप्ताहांतर्गत मैत्री सेवा फाउंडेशन हे नागरिकांना वृक्षचे रोप विकत देणार आहेत. व त्याच बरोबर जो हे रोप विकत घेईल त्याला एक प्रतिज्ञा फॉर्म भरून घेत आहेत. यात रोपा ची देखभाल परिवारा प्रमाणे करावी, त्याची आपल्या घरातील सदस्याप्रमाणे काळजी घ्यावी, निगा राखावी अश्या आशयाची प्रतिज्ञा यात आहे.

उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी गाव असो वा शहर वृक्ष लागवडीवर भर दिला पाहिजे सगळे मिळून वृक्ष लावूया वातावरण स्वच्छ आणि प्रसन्न बनवूया असे मार्गदर्शन केले.

या अभियानाअंतर्गत कमीत कमी पाच वृक्षांची (रोपांची) एक वर्षापर्यंत योग्य ती काळजी घेऊन निगा राखल्यास मैत्री सेवा फाउंडेशनच्या निसर्ग मित्र या पुरस्काराने त्या व्यक्तीस विशेष सन्मानित करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले.

या कार्यक्रमाला  शहरातील शांताराम महाजन, प्रल्हाद महाजन, साई मेडिकल चे संचालक भुषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर महाजन, पियुष चौधरी, पंकज पाटील, करण पाटील, साहिल पिंजारी, शुभम महाजन, मनोज महाजन, संतोष जैस्वाल, ज्ञानेश्वर महाजन, तुषार महाजन, निखिल शेंडे, जयेश पाटील, हेमंत पाटील, प्रितेश पाटील, निलेश बाकळे व सर्व मैत्री फाऊंडेशनचे सदस्य व पदाधिकारी त्यांनी मेहनत घेतली.