नोकरी संधी

NIA : राष्ट्रीय तपास संस्थेत १११ जागांसाठी भरती ; दरमहा ९२ हजारांपर्यंत वेतन मिळेल

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी विशेष । सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या आणि देशाच्या प्रमुख तपास संस्थेत काम करण्याची इच्छा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय तपास संस्था अर्थात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) विविध पदांसाठी भरती जाहीर केलीय. या भरतीद्वारे एकूण १११ रिक्त पदे भरली जाणार असून इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. लक्ष्यात असू द्या २० डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.

या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे पात्र उमेदवारांना ५६ वर्षांपर्यंत अर्ज करण्याची संधी मिळू शकते. पदानुसार २५ हजार ५०० रुपयांपासून ते ९२ हजार ३०० रुपयांपर्यंत वेतनश्रेणी आहे. ही भरती नियमित थेट भरती नसून प्रतिनियुक्तीच्या (Deputation) आधारावर केली जाणार आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा?
सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) : २३ पदे
हेड कॉन्स्टेबल : ५३ पदे
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) : ३५ पदे

या भरतीत हेड कॉन्स्टेबल पदासाठी सर्वाधिक ५३ जागा उपलब्ध आहेत. संबंधित पदांसाठी आवश्यक पात्रता आणि सेवाशर्ती पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे.

५६ वर्षांपर्यंतच्या उमेदवारांना संधी

या भरतीमध्ये कमाल वयोमर्यादा ५६ वर्षांपर्यंत असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, ही भरती प्रतिनियुक्तीच्या आधारावर असल्याने सर्वसामान्य उमेदवारांना थेट अर्ज करून नियुक्ती मिळवता येणार नाही. संबंधित शासकीय विभागात कार्यरत असलेले आणि अधिकृत अधिसूचनेतील पात्रता व सेवाशर्ती पूर्ण करणारे कर्मचारी या संधीसाठी पात्र ठरू शकतात.

त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पदनिहाय शैक्षणिक पात्रता, अनुभव, वेतनस्तर आणि प्रतिनियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या अटी तपासून घ्याव्यात.

किती मिळणार वेतन?

या भरतीमध्ये पदानुसार २५ हजार ५०० रुपये ते ९२ हजार ३०० रुपये अशी वेतनश्रेणी नमूद करण्यात आली आहे. संबंधित पदाचा वेतनस्तर, सध्याचे वेतन आणि प्रतिनियुक्तीचे नियम यानुसार प्रत्यक्ष मिळणारे वेतन निश्चित होईल. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेतील वेतनविषयक तरतुदी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, सेवाविषयक तपशील आणि संबंधित विभागाची आवश्यक मान्यता याबाबत अधिसूचनेत दिलेल्या सूचनांचे पालन करावे. अर्ज निर्धारित नमुन्यात आणि दिलेल्या मुदतीत संबंधित प्राधिकरणाकडे पाठवणे आवश्यक आहे.

अर्जाची अंतिम तारीख २० डिसेंबर

राष्ट्रीय तपास संस्थेतील या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२६ आहे. सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या आणि तपास संस्थेत काम करण्याची इच्छा असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची संधी ठरू शकते. अर्ज करण्यापूर्वी NIA ची अधिकृत जाहिरात तपासून पदनिहाय पात्रता, अर्ज पाठविण्याचा पत्ता आणि आवश्यक कागदपत्रांची खात्री करून घ्यावी.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button