जळगाव जिल्हागुन्हेधरणगाव

धरणगावच्या जबरी चोरी प्रकरणातील दोघांना धुळ्यातून पकडले; दोन वर्षांपासून होते फरार

जळगाव लाईव्ह न्यूज । धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात मागील सुमारे दोन वर्षांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. अजय भाईदास थोरात (वय २७, रा. नवलनगर, धुळे) आणि संभाजी बाळू पाटील (वय २६, रा. सातरने, धुळे) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी दोघांनाही धरणगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यांमधील पाहिजे आणि फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी अधिकारी आणि अंमलदारांचे विशेष पथक तयार केले. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आवश्यक सूचना देऊन पथकाला कारवाईसाठी मार्गदर्शन करण्यात आले.

२१ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत धरणगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी धुळे जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे पथक तातडीने धुळे जिल्ह्यात रवाना झाले. तेथे शोधमोहीम राबवून पोलिसांनी दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी धरणगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात दोन्ही आरोपी मागील सुमारे दोन वर्षांपासून फरार होते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, चाळीसगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, चोपडा उपविभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल हरिलाल पाटील, विलेश सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल कोळी, विलास गायकवाड आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी यांचा समावेश होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button