सोने - चांदीचा भाव

सोने-चांदी खरेदीला जातंय? पहा जळगावमधील आजचा प्रति तोळ्याचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. अशातच आज १७ ऑक्टोबर रोजी जळगावच्या सराफ बाजारातून ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज सोन्याचे दर स्थिर राहिले असून, चांदीच्या दरात प्रतिकिलो २ हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सोन्याचे दर स्थिर

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे चित्र होते. मात्र, १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी सोन्याचे भाव स्थिर राहिल्याचे दिसून आले. जळगावच्या सराफ बाजारात १७ ऑक्टोबर रोजी १० ग्रॅम सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख ५० हजार ८८५ रुपये इतका आहे.

चांदीच्या दरात प्रतिकिलो २ हजारांची घसरण

दुसरीकडे, चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. एक किलो चांदीच्या दरात २ हजार रुपयांची घट झाली असून, जीएसटीसह चांदीचा भाव आता २ लाख १९ हजार ३९० रुपयांवर आला आहे.

गेल्या काही दिवसांतील दरातील चढ-उतारांनंतर चांदीच्या भावात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे. चांदीचे दागिने, वस्तू किंवा गुंतवणुकीसाठी खरेदी करण्याचा विचार करणारे ग्राहक आता दरांच्या पुढील हालचालींकडे लक्ष ठेवून आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button