जळगाव जिल्हा

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

मॉडेल्स, बॉडी पेंटिंग, पीपीटी आणि रांगोळीतून विद्यार्थ्यांनी उलगडले मानवी शरीररचनेचे शास्त्र

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुनवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विविध शैक्षणिक आणि सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शरीररचनाशास्त्रातील ज्ञानाचे प्रभावी सादरीकरण केले.

शरीररचनाशास्त्र हा वैद्यकीय शिक्षणाचा महत्त्वपूर्ण पाया आहे. या विषयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे, अभ्यासातील संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून स्पष्ट व्हाव्यात आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने अ‍ॅनाटॉमी मॉडेल्स, बॉडी पेंटिंग, पीपीटी प्रेझेंटेशन आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मानवी शरीराची रचना, विविध अवयवांची वैशिष्ट्ये आणि त्यांची कार्यपद्धती विविध माध्यमांतून सादर केली.

New Project 1 1

वैज्ञानिक माहितीची सांगड कलात्मकतेशी घालत विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचे आणि कल्पकतेचे दर्शन घडविले.गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. अशा शैक्षणिक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अधिक समृद्ध करावे आणि वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करावी, असे प्रोत्साहन त्यांनी दिले.शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. उमाकांत चौधरी आणि डॉ. मयुरी चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना मार्गदर्शन केले.

अशा उपक्रमांमुळे विषयाची सखोल समज विकसित होण्यासोबतच विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता आणि सादरीकरण कौशल्ये वृद्धिंगत होतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.‘अ‍ॅनाटॉमी डे’च्या आयोजनामुळे महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण अधिक समृद्ध झाले. अभ्यासाला कृतीशील आणि सर्जनशीलतेची जोड देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शरीररचनाशास्त्राविषयी उत्सुकता निर्माण करणारा ठरला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button