महाराष्ट्रजळगाव जिल्हा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीची भेट! खात्यात ५००० रुपये जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा केली. ती म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात तातडीची आर्थिक मदत म्हणून ५,००० रुपये जमा करण्याची घोषणा केली. आज मंत्रालयात पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, यापूर्वी गेल्या 25 वर्षात राज्यात नोव्हेंबरमध्ये दुष्काळ जाहीर होत होता. त्यानंतर शेतकऱ्यांना डिसेंबरमध्ये मदत करण्यात येत होती. आपण यावेळी लवकर दुष्काळ जाहीर केला आहे. आपण यंदा दुष्काळाचा जीआर ऑक्टोबरमध्येच काढला. आज सप्लीमेंटरी जीआर काढला आहे. 12 योजना लागू केल्या आहे. आता दिवाळी येत आहे. शेतकऱ्यांसाठी ही दिवाळी अडचणीची आहे. त्यावर आम्ही मोठा निर्णय घेतला आहे, असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, आधी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला होता. आता ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. ४० तालुके नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत चर्चा केली.

केंद्रातून मदत आल्यावर शेतकऱ्यांना जी मदत करायची ती केली जाणारच आहे. पण आता तातडीचा दिलासा म्हणून आणि त्यातील अग्रीम रक्कम म्हणून शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये दिवाळी पूर्वी देणार आहोत. शेतकऱ्यांच्या हातात काही ना काही दिवाळीत असावे म्हणून निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येणार आहे. दिवाळी पूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे, अशी घोषणाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button