
जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये चारा पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी जमीन आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेल्या इच्छुक पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील पशुधनासाठी चारा सुरक्षा निर्माण करणे आणि हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पशुपालकांसाठी चारा साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. ज्या पशुपालकांकडे पशुधन असून रब्बी हंगामात चारा पिकांची लागवड करण्यासाठी जमीन व सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी दिलेल्या गुगल फॉर्मद्वारे आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशूसंवर्धवन विभाग जळगाव यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
तसेच क्षेत्रीय पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या पशुपालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यास प्रोत्साहित करावे. आवश्यकतेनुसार अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
माहितीअभावी एकही पात्र व इच्छुक पशुपालक अर्ज करण्यापासून वंचित राहू नये, याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी देऊन जास्तीत जास्त पशुपालकांची ऑनलाइन नोंदणी करण्यावर भर देण्यात येत आहे.
ऑनलाइन अर्जासाठी लिंक :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSet3dW9y-uiGL9PuNVTPCL0uOmPvJqY3VuTEKf7s9ZwHtQRgw/viewform?usp=publish-editor
रब्बी हंगामात हिरव्या चाऱ्याचे जास्तीत जास्त उत्पादन घेऊन जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविणे आणि संभाव्य चारा टंचाईचा सामना करण्यासाठी पूर्वनियोजन करणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे पात्र पशुपालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





