
जळगाव लाईव्ह न्यूज । सोने-चांदी खरेदीदारांसाठी खुशखबर आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरामध्ये सातत्याने मोठी चढ-उतार पाहायला मिळत असून आज पुन्हा एकदा सोने-चांदीत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
७ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर झालेल्या बाजारभावानुसार, सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. सोन्याचे दर ६१५ रुपयांनी घसरून १,४९,५०५ रुपये प्रति १० ग्रॅम इतक्या खाली आले आहेत. त्याचप्रमाणे, चांदीच्या दरातही मोठी कपात पाहायला मिळाली असून चांदीचा भाव १,३४१ रुपयांनी घसरून २,२५,९०१ रुपये प्रति किलोग्रॅम वर पोहोचला आहे.
सोन्याच्या दरात झालेल्या या घसरणीमुळे सणासुदीच्या काळात सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळू शकतो. आगामी काळात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी सध्या बाजारात अस्थिरता कायम आहे.




