
जळगाव लाईव्ह न्यूज । मागच्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली. मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी या घसरणीला ब्रेक लागला असून आज दोन्ही धातूंच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना आज स्थिर दराचा फायदा घेता येणार आहे.
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर १ तोळ्यासाठी १ लाख ४९ हजार १८० रुपये इतका आहे. तर १० तोळे सोन्यासाठी ग्राहकांना १४ लाख ९१ हजार ८०० रुपये मोजावे लागतील.
२२ कॅरेट सोन्याचा भावही स्थिर असून, आज १ तोळ्यासाठी १ लाख ३६ हजार ७५० रुपये द्यावे लागतील. तर १० तोळे २२ कॅरेट सोन्याची किंमत १३ लाख ६७ हजार ५०० रुपये आहे. दागिने प्रामुख्याने २२ कॅरेट सोन्यापासून तयार केले जात असल्याने दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा दर महत्त्वाचा आहे.
दरम्यान, १८ कॅरेट सोन्याचा दर १ तोळ्यासाठी १ लाख ११ हजार ८९० रुपये आहे. तर १० तोळे १८ कॅरेट सोन्यासाठी ११ लाख १८ हजार ९०० रुपये खर्च करावे लागतील.चांदीच्या दरातही आज कोणतीही हालचाल झालेली नाही. १ ग्रॅम चांदीचा दर २३५ रुपये, तर १ किलो चांदीचा दर २ लाख ३५ हजार रुपये इतका आहे.
सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ किंवा घसरण झालेली नसल्याने सराफा बाजारातील भाव स्थिर राहिले आहेत. त्यामुळे आगामी काळातील दरातील हालचालींकडे ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.




