डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात नवोदित विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ

सप्टेंबर 21, 2026 5:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी फाउंडेशन्स संचालित डॉ.उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने नवोदित विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या कृषी कॅम्पस मधील सोयी-सुविधांचा पुरेपूर वापर करून नियमित वर्गांना उपस्थित राहण्याचा आणि शंभर टक्के उपस्थिती ठेवण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला.

deeksharambha

कार्यक्रमाचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, कृषी क्षेत्रात करिअरच्या अथांग संधी उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून प्रात्यक्षिक ज्ञानाची नितांत गरज आहे. महाविद्यालयाचा अथांग कृषी कॅम्पस, तेथील प्रयोगशाळा, आणि संशोधन क्षेत्र हे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी केवळ वर्गातच नव्हे, तर कॅम्पसवरील प्रत्येक प्रात्यक्षिक कार्यात हिरीरीने भाग घेतला पाहिजे.

New Project 1 1

पुढे बोलताना त्यांनी नियमित वर्ग आणि उपस्थितीच्या महत्त्वावर विशेष भर दिला. “नियमितपणे वर्गात उपस्थित राहिल्याने विषयाची संकल्पना स्पष्ट होते आणि प्राध्यापकांशी थेट संवाद साधता येतो. ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती उत्तम असते, तेच विद्यार्थी भविष्यात यशस्वी कृषी शास्त्रज्ञ, अधिकारी किंवा उद्योजक बनू शकतात,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या दीक्षारंभ कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कृषी अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक चौधरी, कृषी अभियांत्रिकेचे प्राचार्य डॉ. पूनमचंद सपकाळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते

तसेच कृषी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रविण देवरे, प्रशासकीय अधिकारी मोहन सूर्यवंशी, प्रा. शरद पाटील, प्रा. निलेश सदर, प्रा. वैभव पाटील, प्रा. शरद पाटील, डॉ. ज्ञानेश्वर सिंग, डॉ. अंकित आलोक, प्रा. कार्तिक खर्चे, प्रा. गौरव बाविस्कर, प्रा.सुशिल चव्हाण, प्रा. प्रियल राठी , प्रा. सायली विधाटे, प्रा.जागृती ठाकरे , प्रा. माधुरी भोळे इतर शिक्षकेत्तर कर्मचारी आणि प्रथम वर्षाचे विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया देशमुख आणि पार्थ पवार या विद्यार्थ्यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ. ज्ञानेश्वर सिंग यांनी केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now