अरे देवा..! सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ; पाहा जळगावचे आजचे दर

सप्टेंबर 16, 2026 2:59 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सणासुदीच्या दिवसाला सुरुवात होत असतानाच जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या मौल्यवान धातूंच्या दरांनी आज अचानक उसळी घेतली आहे. त्यामुळे सणासुदीत सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांच्या खर्चात वाढ होणार आहे.

goldsilver

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात १ हजार ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

काय आहेत सोने-चांदीचा दर?

आज जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याचा भाव १ लाख ५६ हजार ४५ रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, एक किलो चांदीचा जीएसटीसह दर २ लाख ४१ हजार २० रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरातही आज तब्बल २ हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

दरातील बदलांमागील कारणे

तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीच्या दरातील हे चढ-उतार आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, अमेरिकन डॉलरचा दर, स्थानिक मागणी तसेच इतर आर्थिक घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे आगामी काळात हे दर कोणत्या दिशेने वाटचाल करणार, याकडे आता सराफ व्यावसायिक आणि ग्राहकांचे डोळे लागले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now