जळगाव जिल्हा पोलिस दलात खांदेपालट; तीन पोलिस निरीक्षकांच्या नव्या नियुक्त्या

सप्टेंबर 8, 2026 7:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा पोलिस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले असून तीन पोलिस निरीक्षकांच्या नव्या नियुक्त्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Maharashtra Police Bharati 2022

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी प्रशासकीय कारणास्तव तीन पोलिस निरीक्षकांच्या नवीन नियुक्त्यांचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार पोलिस निरीक्षक निवृत्ती भिमराव बो-हाडे यांची जामनेर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलिस निरीक्षक शरद उत्तमराव शेवाळे यांची जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक नितीन सुदाम पाटील यांची आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव येथे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी तत्काळ कार्यभार स्वीकारून अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, पोलिस निरीक्षक स्वप्नील शिंदे यांना जामनेर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदाच्या कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे. तसेच पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना आर्थिक गुन्हे शाखा, जळगावच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त करण्यात आले आहे.

याशिवाय पोलिस निरीक्षक अनिल लोटन वाघ यांना जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या प्रभारी पदाच्या कार्यभारातून मुक्त करण्यात आले असून, त्यांना जळगाव जिल्हा पोलिस दलातील कायदा व सुव्यवस्था शाखेत कार्यरत करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now