जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुम्ही पदवीसाठी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असेल, तर तुम्हाला एसएससी (SSC) मार्फत सरकारी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) एकूण १,७४८ ज्युनियर इंजिनिअर पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. SSC JE Bharti 2026

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवार एसएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ सप्टेंबर, २०२६ आहेत.

भरतीसाठी पात्रता काय?
एसएससीमधील ज्युनियर इंजिनिअर पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांकडे भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकीमधील पदवी असणे आवश्यक आहे. पदानुसार कमाल वयोमर्यादा ३० ते ३२ वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देखील दिली जाईल.
अर्ज शुल्क
अनामत प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना ₹100 ऑनलाइन भरावे लागतील. तथापि, अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती, महिला आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवार त्यांचे अर्ज विनामूल्य भरू शकतात.
वेतनश्रेणी – निवड झालेल्या उमेदवारांना गट ब अराजपत्रित पदे, स्तर ६ साठी दरमहा ₹३५,४००-११२,४०० दिले जातील.
अर्ज कसा करावा
एसएससी ज्युनियर इंजिनिअर पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना मदत करण्यासाठी, खालील पायऱ्या दिलेल्या आहेत. उमेदवार या पायऱ्यांचे अनुसरण करून त्यांचे अर्ज भरू शकतात.
अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
वेबसाइटच्या होमपेजवरील नोंदणी (registration) विभागावर क्लिक करा.
त्यानंतर, SSC ज्युनियर इंजिनिअर (JE) भरती २०२६ या लिंकवर क्लिक करा.
लिंकवर क्लिक केल्यानंतर, सर्व आवश्यक तपशील भरा.
तुमचे लॉगिन तपशील भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
शेवटी, अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआउट घ्या.










