चाळीसगावात भरधाव कारने तिघा महिलांना उडविले; एकीचा जागीच मृत्यू, दोघी गंभीर

सप्टेंबर 2, 2026 12:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड गावाजवळ भरधाव कारने रस्त्याने जाणाऱ्या तीन महिलांना जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना १ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता घडली. या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, तीन महिला रस्त्याने जात असताना भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी झाली.

दरम्यान, या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा तपास चाळीसगाव शहर पोलीस करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now