रक्षाबंधनानंतर जळगावात सोने-चांदीत मोठी उलथा पालथ; आजचे नवीन दर तपासून घ्या..

ऑगस्ट 29, 2026 3:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । देशात सणासुदीच्या दिवसाला सुरुवात झाली आहे. आणि अशात सोने-चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने खरेदीदारांच्या बजेटवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, आज जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घसरण नोंदवण्यात आली आहे.

gold silver 1 jpg webp

आजच्या व्यवहारात १० ग्रॅम सोन्याच्या दरात तब्बल २ हजार ३०० रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर एक किलो चांदीच्या दरातही ४ हजार रुपयांची घसरण झाली आहे. अचानक झालेल्या या दरकपातीमुळे सराफ बाजारात ग्राहकांचे लक्ष वेधले गेले आहे.

सोन्याचा दर किती झाला?

आजच्या घसरणीनंतर जळगाव सराफ बाजारात जीएसटीसह १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ६० हजार ६८० रुपये इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत ही घसरण ग्राहकांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

चांदीही स्वस्त

सोन्यासोबतच चांदीच्या दरातही घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा जीएसटीसह दर २ लाख ४८ हजार २३० रुपये इतका झाला आहे. चांदीच्या दरात ४ हजार रुपयांची घट झाल्याने चांदी खरेदी करणाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये दररोज चढ-उतार होत असल्याने ग्राहकांनी खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफ बाजारातील ताजे दर तपासणे आवश्यक आहे. आज झालेल्या घसरणीमुळे लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही संधी महत्त्वाची ठरू शकते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now