बहिणींनी बांधली राखी, पालकमंत्री गुलाबराव पाटील झाले भावुक; म्हणाले, ‘हीच माझी खरी श्रीमंती’

ऑगस्ट 29, 2026 12:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राजकारणातील पद, जबाबदाऱ्या आणि व्यस्तता कितीही वाढली तरी भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा कायम असतो. याच भावनेचा हृदयस्पर्शी अनुभव रक्षाबंधनाच्या निमित्ताने चोपडा येथे पाहायला मिळाला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या बहिणी सौ. निर्जलाताई देशमुख आणि सौ. सुशीलाताई गुजर यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांसोबत रक्षाबंधन साजरे केले.

rakhiGP

बहिणींनी गुलाबराव पाटील यांचे औक्षण करून त्यांच्या मनगटावर राखी बांधली. यावेळी बहिणींनी भावाच्या उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य आणि यशासाठी शुभेच्छा दिल्या. गुलाबराव पाटील यांनीही बहिणींना भेटवस्तू देत आपला स्नेह व्यक्त केला. कुटुंबीयांच्या उपस्थितीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने वातावरण भावनिक आणि आनंदमय झाले होते.

‘पद कितीही मोठे असले तरी बहिणीसाठी भाऊ कायम भाऊच’

यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “राजकारणात पद कितीही मोठे मिळाले आणि जबाबदाऱ्या कितीही वाढल्या, तरी बहिणीसाठी भाऊ हा कायम भाऊच असतो. मनगटावर बांधलेला राखीचा धागा छोटा असला, तरी त्यात बालपणाच्या असंख्य आठवणी, आई-वडिलांचे संस्कार आणि बहिणीची आयुष्यभराची माया गुंफलेली असते.”“बहिणींचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझ्या आयुष्यातील खरी श्रीमंती आहे,” अशी भावनिक भावना त्यांनी व्यक्त केली.

‘माझ्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी सदैव उभा राहीन’

सार्वजनिक जीवनातील असंख्य माता-भगिनींच्या प्रेमाचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. “माझ्या सख्ख्या बहिणींच्या मायेबरोबरच सार्वजनिक आणि राजकीय जीवनात असंख्य माता-भगिनींचे प्रेम व आशीर्वाद लाभले. अनेकांनी मला मंत्री म्हणून नव्हे, तर आपल्या कुटुंबातील भाऊ म्हणून प्रेम दिले. हा विश्वास माझ्यासाठी कोणत्याही पदापेक्षा मोठा आहे,” असे ते म्हणाले.

“राखीचा प्रत्येक धागा मला या प्रेमाची आणि नात्याची जाणीव करून देतो. माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या सुख-दुःखात भाऊ म्हणून मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा राहीन,” अशी भावनिक ग्वाही गुलाबराव पाटील यांनी दिली.

रक्षाबंधन आणि भाऊबीजेच्या निमित्ताने बहिणींसोबत सण साजरा करण्याची परंपरा गुलाबराव पाटील यांनी वर्षानुवर्षे जपली आहे. “वय वाढते, जबाबदाऱ्या वाढतात; पण बहिणीच्या हातून राखी बांधून घेताना मन पुन्हा बालपणात जाते,” अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now