गोदावरी अभियांत्रिकीच्या प्रा.डॉ. ललिता पाटील ’राष्ट्रीय नवोदय पुरस्कार २०२६’ सन्मानित

ऑगस्ट 24, 2026 4:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटी विभागाच्या सह-प्राध्यापक डॉ. ललिता पाटील यांना सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील पीएच.डी. संशोधनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित ’राष्ट्रीय नवोदय पुरस्कार-२०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यासोबतच त्यांची तंत्रज्ञान विभागात ’नवोदयन ऑफ द इयर २०२६’ म्हणून निवड झाली आहे.

lalita patil

यावर्षी या राष्ट्रीय पुरस्कारासाठी देशभरातून १४० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ९५ उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. अंतिम निवड प्रक्रियेनंतर विविध क्षेत्रांतील केवळ २६ गुणवंत प्रतिभांची ’नवोदयन ऑफ द इयर २०२६’ साठी निवड झाली, ज्यामध्ये तंत्रज्ञान विभागातून डॉ. ललिता पाटील यांनी हे यश संपादन केले.जवाहर नवोदय विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या डॉ. पाटील यांनी उच्च शिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्याला गती दिली आहे.

राष्ट्रीय पातळीवर मिळालेली ही ओळख त्यांच्या अखंड संशोधन, मेहनत आणि समर्पणाचा सन्मान आहे.त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now