बदलत्या वातावरणात डोळ्यांचा संसर्ग, धोका वाढला; मेंब्रेनस कंजंक्टिव्हायटिसचे रुग्णात वाढ

ऑगस्ट 21, 2026 8:19 PM

वेळीच निदान व उपचार आवश्यक; स्वयं-औषधोपचार टाळण्याचे डॉ. नितु पाटील यांचे आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज । सध्याच्या बदलत्या वातावरणात डोळ्यांच्या संसर्ग रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून,यामध्ये ’मेंब्रेनस कंजंक्टिव्हिटिस’चे रुग्ण प्रामुख्याने आढळत आहेत. हा नेहमीच्या डोळे येण्यापेक्षा (सामान्य कंजंक्टिव्हिटिस) अधिक गंभीर प्रकार असून, वेळीच निदान व उपचार आवश्यक; स्वयं-औषधोपचार टाळण्याचे आवाहन नेत्ररोग तज्ञ डॉ. नितु पाटील यांनी केले आहे.

dd 2

मेंब्रेनस कंजंक्टिव्हिटिस म्हणजे काय? हा संसर्ग मुख्यत्वे ’एडिनोव्हायरस’ मुळे होतो. याशिवाय स्ट्रेप्टोकोकस आणि स्टॅफिलोकोकस या जिवाणूंच्या संसर्गामुळेही हा आजार वाढतो. हवामानातील बदल: पावसाळा किंवा दमट हवामानात हे विषाणू वेगाने पसरतात, ज्यामुळे रुग्णांची संख्या अचानक वाढते.अस्वच्छता आणि संसर्ग: बाधित व्यक्तीच्या डोळ्यातील स्रावाशी थेट किंवा अप्रत्यक्ष संपर्क आल्यास (उदा. टॉवेल, रुमाल किंवा मोबाईल शेअर केल्याने) हा आजार वेगाने पसरतो. सामान्य डोळे येण्याच्या प्रकारात डोळे लाल होतात आणि पाणी किंवा पू येतो. परंतु, मेंब्रेनस कंजंक्टिव्हिटिसमध्ये डोळ्यांच्या आतल्या त्वचेवर (कंजंक्टायव्हा) सूज येऊन त्यावर फायब्रिन आणि पांढर्‍या रक्तपेशींचा एक जाड थर किंवा पडदा तयार होतो. हा पडदा डोळ्याच्या अत्यंत संवेदनशील भागाला चिकटलेला असतो. अनेकदा हा पडदा काढताना किंवा साफ करताना डोळ्यातून रक्तस्त्राव देखील होतो.

डोळे अत्यंत लाल होणे आणि पापण्यांना मोठी सूज येणे.डोळ्यांतून सतत जाड, पिवळसर किंवा पांढरा पू येणे.डोळ्यात काहीतरी टोचत असल्यासारखी तीव्र वेदना होणे.प्रकाशाकडे पाहताना त्रास होणे.डोळ्याच्या आतल्या बाजूला पांढरट-गर्द रंगाचा पडदा दिसणे. या आजाराची लक्षणे दिसताच ताबडतोब नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मेंब्रेनस कंजंक्टिव्हिटिस हा संसर्गजन्य असला तरी वेळेवर अचूक उपचार घेतल्यास तो पूर्णपणे बरा होतो. डोळ्यांत कोणतेही गंभीर लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. घरगुती उपाय स्वतः हुन कारण्याचे टाळा..!डॉ. नितु पाटील,डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व वासुदेव नेत्रालय

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now