धरणगावच्या अपघातग्रस्त तरुणाला पालकमंत्र्यांची ५० हजारांची मदत; अन्य दानशूरांनी पुढे येण्याचे आवाहन

ऑगस्ट 21, 2026 4:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । एका गंभीर अपघातात जखमी झालेल्या धरणगाव शहरातील विशाल भरत चौधरी (वय २५) या तरुणाच्या मेंदू आणि डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी तब्बल २० लाखांहून अधिक खर्च झाला आहे. या अपघातग्रस्त तरुणाला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. अन्य काही दानशूरही मदतीसाठी पुढे आहेत. चौधरी कुटुंबाला मदतीचे आवाहन मदत सहाय्यता समिती, धरणगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे.

GP help

धरणगाव येथील भरत भिका चौधरी यांचा मुलगा विशालचा एप्रिल महिन्यात पुण्यात दुचाकी अपघात झाला होता. या अपघातात विशालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी साडेसात लाख रुपयांचा खर्च झाला. चौधरी यांनी बचत, दागिने आणि नातेवाईकांकडून ही रक्कम उभी केली. दरम्यान, २ मे रोजी रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर विशालची फिजिओथेरपी सुरू होती. मात्र, अपघातामुळे डोळ्यांच्या रक्तवाहिनीला झालेली इजा गंभीर रूप धारण करू लागली आणि विशालची दृष्टी कमी होऊन एक डोळा बंद झाला. डॉक्टरांनी तातडीने दुसरी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला, अन्यथा कायमचे अंधत्व येण्याचा धोका व्यक्त केला. त्यानुसार ६ ऑगस्ट रोजी पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात विशालच्या डोळ्यांची दुसरी मेजर सर्जरी करण्यात आली. यासाठी ११ लाख ५० हजार रुपयांचा खर्च आला.

शासकीय मदतीच्या नियमांमधील अडचणींमुळे या कुटुंबाला अद्याप मदत मिळू शकलेली नाही. आतापर्यंत दोन्ही प्रमुख शस्त्रक्रिया व वैद्यकीय उपचारांमुळे चौधरी कुटुंबावर २० लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. या कठीण प्रसंगात मदत म्हणून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तसेच विनय भावे, विलास महाजन आणि वाल्मिक पाटील यांनी प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत चौधरी कुटुंबाला सुपूर्द केली आहे.

विशालचे भविष्य आणि चौधरी कुटुंबाचा संघर्ष लक्षात घेता, नागरिकांनी, मित्र परिवाराने व दानशूर व्यक्तींनी आपापल्या क्षमतेनुसार मदत कराव. मदत पाठवण्यासाठी गुगल पे क्रमांक : 97645 33225. एका तरुणाचे आयुष्य पूर्ववत व्हावे यासाठी सर्वांनी मदतीचा हात पुढे करावा, अशी विनंती आपात्कालीन मदत सहाय्यता समिती, धरणगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now