भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ चार एक्स्प्रेसला अतिरिक्त एसी कोच

ऑगस्ट 17, 2026 3:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भुसावळामार्गे धावणाऱ्या चार एक्स्प्रेस गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त वातानुकूलित द्वितीय श्रेणी (एसी २-टियर) कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीच्या काळात प्रवाशांना अतिरिक्त आसन क्षमता उपलब्ध होणार आहे.

ac coach

रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानुसार, यशवंतपूर-चंदीगड एक्स्प्रेस (२२६८५) ला ५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान यशवंतपूरहून सुटताना अतिरिक्त एसी २-टियर कोच जोडला जाईल. परतीच्या चंदीगड-यशवंतपूर एक्स्प्रेस (२२६८६) ला ८ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान हा अतिरिक्त डबा उपलब्ध असेल.

तसेच यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (१२६२९) ला १८ ऑगस्ट ते १ ऑक्टोबरदरम्यान, तर हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस (१२६३०) ला १९ ऑगस्ट ते २ ऑक्टोबरदरम्यान अतिरिक्त एसी २-टियर कोच जोडण्यात येणार आहे.

याशिवाय म्हैसूर-वाराणसी एक्स्प्रेस (२२६८७) ला ३ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान आणि वाराणसी-म्हैसूर एक्स्प्रेस (२२६८८) ला ५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान अतिरिक्त एसी २-टियर कोचची सुविधा मिळणार आहे.

हुबळी-बनारस एक्स्प्रेस (१७३२३) ला ११ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान, तर बनारस-हुबळी एक्स्प्रेस (१७३२४) ला १३ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान अतिरिक्त वातानुकूलित द्वितीय श्रेणीचा डबा जोडण्यात येणार आहे.

प्रवाशांची वाढती मागणी आणि गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा तात्पुरता निर्णय घेतला असून, यामुळे संबंधित मार्गांवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now