जळगाव लाईव्ह न्यूज । राजस्थानमध्ये मालाचे पैसे मिळत नसल्याने जळगावातील एका कंपनी मालकाने जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. योगेश एकनाथ नेमाडे (३९, रा. ईश्वर कॉलनी) यांनी गळ#$फास घेऊन आत्म#$हत्या केल्याची घटना (१० ऑगस्ट) एमआयडीसी परिसरातील महालक्ष्मी इरिगेशन कंपनीत घटना घडली.

योगेश नेमाडे हे त्यांचा भाऊ मनूर नेमाडे यांच्यासोबत एमआयडीसीतील एम-९१ सेक्टरमध्ये महालक्ष्मी इरिगेशन नावाची कंपनी चालवत होते. सोमवारी योगेश यांनी याच कंपनीत गळ#$फास घेतला. हा प्रकार त्यांच्या भावाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय म्हटले आहे सुसाईड नोटमध्ये?
मयत योगेश नेमाडे यांनी सुसाईड नोटमध्ये राजस्थानमधील फर्म व त्याच्या मालकाचे नाव लिहिले असून त्याने ७ लाख रुपयांमध्ये फसविले असल्याचे नमूद केले आहे. तसेच वारंवार कॉल करून सुद्धा तो फोन उचलत नाही. त्याने एक वेळा १३ हजार व काल ८ हजार रुपये दिले आहे. तसेच पत्नीलाही उद्देशून काही ओळी लिहून मुलीचा व्यवस्थित सांभाळ कर असे म्हटले आहे. तसेच घरातील काही सदस्यांची नावे लिहून त्यांना काही सल्ले देत माफीही मागितली आहे. तसेच कोणाकडून पैसे घेतले आहेत, त्यांना किती पैसे द्यायचे आहेत, याचाही उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. तसेच ‘त्याला सोडू नकोस, केस कर, कॉल लिस्ट नक्की चेक करा’, असे भावाला यातून सांगितले आहे.
उधारीचा उल्लेख
योगेश नेमाडे यांनी सुसाईड नोट लिहिलेली आहे. त्यात त्यांनी उधारीचा उल्लेख करीत समोरील व्यक्तीने फसविले असून ‘कंटाळा आला आहे, आता मी निघतो’ असेही म्हटले आहे. या कंपनीकडून राजस्थानमधील धार जिल्ह्यातील राजोद येथील एका फर्मने माल घेतला होता. त्याचे ७ लाख रुपये त्यांच्याकडून येणे बाकी होते. वारंवार कॉल करूनही पैसे मिळत नसल्याचे योगेश यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.










