गुन्हेजळगाव जिल्हा

अवैध दारूविक्रीवर जळगाव पोलिसांची कारवाई ; २४ लाखांचा मुद्देमाल नष्ट, ८२ गुन्हे दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत हातभट्टीच्या दारूविक्रीसह पानटपऱ्या आणि भंगार दुकानांवरही कारवाई करण्यात आली.

dd

या कारवाईत हातभट्टीच्या दारूविक्रीप्रकरणी ८२ गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी २२ हजार २३ लिटर गावठी दारू, रसायन व इतर साहित्य असा एकूण २४ लाख १३ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. याशिवाय जिल्ह्यातील ११३ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली.

अवैध धंद्यांविरोधातील या मोहिमेत १७७ पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ३१ पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच ७ भंगार दुकानांमध्ये संशयास्पद आढळलेल्या मालावर कारवाई करण्यात आली.

पोलिसांच्या या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील अवैध दारूविक्री आणि इतर अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील काळातही अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button