जळगावात घरफोडीचा गुन्हा उघड ! दोन अट्टल चोरटे जेरबंद; ७० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

जुलै 29, 2026 1:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील मलीक नगर परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणत दोन अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि तीन मोबाईलसह एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

gd

कशी घडली होती घटना?

जळगाव शहरातील मलीक नगरमधील बॉम्बे बेकरीच्या मागे राहणाऱ्या एका नागरिकाच्या घरात २५ जुलै २०२६ रोजी रात्री ११:३० ते २६ जुलै २०२६ रोजी पहाटे ४:३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली होती. चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि ३ मोबाईल फोन असा ऐवज लांबवला होता. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.

त्यानुसार २८ जुलै रोजी मास्टर कॉलनी परिसरात सापळा रचून आरोपी आदिल खान सादिक खान (वय ३०) आणि अरजान उर्फ दालचावल खान अक्रम खान (वय ३०, दोघेही रा. मास्टर कॉलनी, जळगाव) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान दोघांनीही घरफोडीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून सोन्याचे पान, कानातील सोन्याचे टॉगल तसेच विवो आणि रेडमी कंपनीचे तीन मोबाईल असा एकूण ७० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now