मोबाइल हॅक करून जळगावातील शिक्षकाची ३.२२ लाखांची ऑनलाइन फसवणूक

जुलै 24, 2026 12:34 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ऑनलाईन सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच जळगाव शहरात मोबाइल हॅक करून एका शिक्षकाची ३ लाख २२ हजार ५०० रुपयांची ऑनलाइन सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात सायबर भामट्यांनी मोबाइलमधील माहिती मिळवून अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डचा गैरवापर करत अॅमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी केले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fraud jpg webp

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाबळ परिसरातील अनुराग कॉलनी येथील रहिवासी गिरीश वामनराव देवकर (वय ४५) हे शिक्षक आहेत. अज्ञात आरोपीने त्यांचा मोबाइल हॅक करून त्यातील वैयक्तिक माहिती आणि अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवली.

यानंतर आरोपीने ६ ते ९ जुलै या कालावधीत देवकर यांच्या क्रेडिट कार्डवरून परस्पर अॅमेझॉन गिफ्ट कार्ड खरेदी करत ३ लाख २२ हजार ५०० रुपयांचा आर्थिक गंडा घातला. बँक व्यवहारांची माहिती तपासल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गिरीश देवकर यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात सायबर आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now