यावल तालुका हादरला ! आईने मुलासह घेतली विहिरीत उडी

जुलै 14, 2026 9:12 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल लुक्यातील एका गावातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलासह विहिरीत उडी घेतलीय. या दुर्दैवी घटनेत तीन वर्षांच्या निष्पाप बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

well

घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी जळगाव रुग्णालयात धाव घेतली.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलली. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्राथमिक चौकशीची प्रक्रिया सुरू होती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

“या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर तिचा अधिकृत जबाब नोंदविण्यात येईल, त्यानंतरच नेमकी माहिती समोर येईल. तोपर्यंत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा विविध तर्कवितर्क लावू नयेत,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात आणि संबंधित परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories