जळगाव जिल्ह्यात काल दमदार पाऊस, आज कशी राहणार पावसाची स्थिती? IMD कडून महत्वाचा इशारा

जुलै 9, 2026 9:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२६ । राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर कायम असून, आज गुरुवारी देखील जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. काल (बुधवारी) दिवसभर जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यानंतर आजही जिल्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Rain

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) संपूर्ण देशभर सक्रिय झाले असून पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यातच गुजरात आणि केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज जळगावसह मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे तसेच नाशिकच्या घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, काल बुधवारी जळगाव जिल्ह्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली. ८ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात हंगामातील सर्वाधिक २६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलैच्या पहिल्या ७ दिवसांतच जिल्ह्यात ७७ मिमी पाऊस झाला आहे, जो जून महिन्यातील एकूण ८५ मिमी पावसाच्या जवळपास आहे. आता ८ जुलैपर्यंतच्या सरासरीच्या २४ टक्के पाऊस झाला आहे. बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे पाचोऱ्याच्या वरखेडी मंडळात अतिवृष्टी झाली. दुसरीकडे पावसामुळे जिल्ह्यातील धारणांच्या जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now