जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२६ । राज्यात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील पाच दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. जळगावसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, रत्नागिरी जिल्ह्यासाठी १ जुलै रोजी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

आज या जिल्ह्यांना अलर्ट
हवामान विभागाच्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार आज १ जुलै रोजी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, सातारा घाट, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, मुबंई शहर, मुबंई उपनगर, कोल्हापूर घाट, पुणे घाट येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.

२ जुलै
रेड अलर्ट : पालघर, पुणे घाट
ऑरेंज अलर्ट : ठाणे, रायगड, अकोला, अमरावती, चंद्रपुर, वर्धा, कोल्हापूर घाट, सातारा घाट, भंडारा, नागपूर, रत्नागिरी, मुबंई शहर, मुबंई उपनगर
येलो अलर्ट : जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, बीड, छ. संभाजीनगर, नांदेड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
.
३ जुलै
ऑरेंज अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग बुलढाणा, अकोला, अमरावती, कोल्हापूर घाट सातारा घाट
रेड अलर्ट : रायगड, पुणे घाट
येलो अलर्ट : जळगावसह नंदुरबार, धुळे, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, पुणे, वाशीम, यवतमाळ, वर्धा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
४ जुलै
रेड अलर्ट : ठाणे, रायगड, पुणे घाट
ऑरेंज अलर्ट : मुंबई उपनगर, मुंबई शहर, पालघर, नाशिक घाट, सिंधुदुर्ग, रत्नागिरी कोल्हापूर घाट, सातारा घाट
येलो अलर्ट : नंदुरबार, धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
५ जुलै
रेड अलर्ट : सातारा घाट
ऑरेंज अलर्ट : मुंबई उपनगर, मुंबई शहर, पालघर, रायगड, ठाणे, नाशिक घाट, सिंधुदुर्ग, रत्नागिरी कोल्हापूर घाट, पुणे घाट
येलो अलर्ट : नंदुरबार, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
दरम्यान, हवामान विभागाने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.








