सुवर्णनगरीत दरांची घसरगुंडी! जळगावात सोने ५ हजारांनी तर चांदी १६ हजारांनी स्वस्त! नवीन दर काय?

जून 20, 2026 9:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या शांतता करारानंतर जागतिक बाजारात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. याचा थेट परिणाम जळगावच्या सुवर्णपेठेवरही झाला असून सोन्या-चांदीच्या दरांत मोठी घसरण झाली आहे. मागच्या गेल्या चार दिवसांपासून बाजारात मौल्यवान धातूंचे दर वेगाने आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

gold

मागच्या २४ तासात जळगाव सराफ बाजरात सोन्याचे दर तब्बल ३,१९३ रुपयांनी तर चांदीचे दर ८,२४० रुपयांनी घसरले. या मोठ्या घसरणीमुळे सोन्याचा दर पुन्हा एकदा दीड लाखाच्या घरात आला आहे. गेल्या चार दिवसांचा विचार केला तर सोने एकूण ५,०४७ रुपयांनी तर चांदी तब्बल १६,४८० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

चांदी विक्रमी उच्चांकावरून २.४६ लाखांवर
जानेवारी २०२६ च्या सुरुवातीला औद्योगिक मागणी अचानक वाढल्याने चांदीने ४,२२,३०० रुपये प्रति किलो या ऐतिहासिक व विक्रमी भावाला स्पर्श केला होता. मात्र, त्यानंतरच्या गेल्या चार महिन्यांत चांदीत सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे.

काल झालेल्या ८,२४० रुपयांच्या घसरणीमुळे आज शनिवारी सकाळी चांदीचा एक किलोचा दर २,४६,१७० रुपयांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे सोन्याचा भाव प्रति तोळा १,५०,१७४ रुपयांवर स्थिरावला आहे. सलग होत असलेल्या या घसरणीमुळे जळगावच्या सुवर्ण बाजारात खरेदीदारांमध्ये आता पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now