पारोळ्यात नात्याला काळिमा! १३ वर्षांच्या मुलीचा विनयभंग प्रकरणी नराधम काका गजाआड

जून 3, 2026 3:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे महिलासंह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असताना अशातच पारोळ्यात नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे.आई-वडील घरी नसताना नात्याने काका लागणाऱ्या नातेवाईकानेच एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा घरात घुसून विनयभंग केला. याप्रकरणी पारोळा पोलिसात ‘पोक्सो’ (POCSO) आणि नवीन भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी आनंदा त्र्यंबक शिंदे याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

crime 12 jpg webp

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी पहाटेच्या सुमारास पीडित मुलीचे आई-वडील शेतात काम करण्यासाठी गेले होते, तर तिची आई संशयित आरोपी आनंदा शिंदे याच्याच घरी एका लग्नकार्यासाठी गेली होती. सकाळी ८ वाजेच्या सुमारास मुलगी घरात एकटीच नाश्ता करत होती. हीच संधी साधून आरोपी आनंदा शिंदे याने घरात प्रवेश केला. “आई-वडील कुठे आहेत?” अशी चौकशी करून मुलगी एकटी असल्याची खात्री पटताच, त्याने तिचा हात धरून तिला बळजबरीने स्वयंपाकघरात ओढले. तिथे तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केला. पीडितेने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि घराच्या मागच्या दाराने थेट आजीच्या घरी पळ काढला.

घटनेनंतर नराधम आरोपीने, “याबाबत कोणाला काही सांगितले तर तुला जिवंत मारून टाकेन,” अशी धमकी पीडितेला दिली. या धमकीमुळे अल्पवयीन मुलगी प्रचंड मानसिक दडपणाखाली आली होती. तिने भीतीपोटी दोन दिवस कोणाशीही संवाद साधला नाही, जेवण बंद केले आणि ती रात्री झोपेतून दचकून उठत होती. मुलीच्या या बदललेल्या वर्तनामुळे आई-वडिलांना संशय आला. २ जून रोजी सकाळी त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने रडत रडत तिच्यासोबत घडलेला हा संपूर्ण थरार सांगितला.

घटनेचे गांभीर्य ओळखून पालकांनी तात्काळ पारोळा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आनंदा त्र्यंबक शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पारोळा पोलिसांनी घटनेची दखल घेत तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली आणि संशयित आरोपी आनंदा शिंदे याला तात्काळ अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय भोंबे करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now