ग्रामीण रस्त्यांचा कायापालट होणार! आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत 3 धडाकेबाज निर्णय

जून 2, 2026 3:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२६ । राज्य मंत्रिमंडळाची आज २ जून रोजी महत्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेतकरी कर्जमाफीला मान्यता देण्यात आली असून त्यासोबतच ३ महत्त्वाचे अन् धडाकेबाज निर्णय घेण्यात आले आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आंतरराष्ट्रीय बँकेकडून कोट्यवधींच्या कर्ज प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकत घेण्यात आलेले हे निर्णय कोणते आहेत, ते जाणून घेऊ या..

mantralay fadanvis

राज्यमंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय कोणते?

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जास तसेच राज्य निधीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली आहे.

८ हजार ७०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार

तसेच, रस्त्यांच्या सुधारणेसाठी आशियाई पायाभूत गुंतवणूक बँके व न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय मिळालेले असून महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्पाला दोन्ही बँकाकडून प्रत्येकी ८ हजार ७०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. या अर्थसहाय्याामुळे राज्यातील रस्ते सुधारणा व विकासाला आणखी गती मिळणार आहे. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत केले जात आहे.

सहा महाविद्यालयांबाबत मोठा निर्णय

हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ, मुंबई या समूह विद्यापीठामध्ये सहा महाविद्यालयांचा समावेश करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. यामध्ये प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, मुंबई, किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय, मुंबई, श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय, मुंबई, ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्ल असोमुल्ल विज्ञान महाविद्यालय, मुंबई व थडोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई यांचा घटक महाविद्यालये म्हणून समावेश होणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्याची शिक्षण तसेच रस्ते विकासात मोठी प्रगती होणार आहे. लवकरच राज्यात या निर्णयांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

महामंडलात अधिकाऱ्यांची केली जाणार नेमणूक

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत परशुराम अर्थिक महामंडळ, लिंगायत समाजासाठी असे एकूण चार महामंडळातील अधिकारी भरण्याच्या संदर्भात आज निर्णय झाला आहे. त्यासाठी ⁠५० कोटी रुपये निधी दिला जाणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now